ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मोडला पाकिस्तानचा 'हा' विश्वविक्रम

ऑस्ट्रेलियाचा पराभव करत भारताने मोडला पाकिस्तानचा 'हा' विश्वविक्रम

'हा' विश्वविक्रम करणारा भारत ठरला पहिला देश

भारतीय संघाने अप्रतिम कामगिरी करत तिसऱ्या टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचा 6 गडी राखून पराभव केला. यासह टीम इंडियाने २-१ ने मालिका खिशात घातली आहे. या सामन्यात गोलंदाज आणि फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवताच भारतीय संघाने एक विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया चांगली कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाच्या पराभवासह भारतीय संघ एका वर्षात सर्वाधिक टी-२० सामने जिंकणारा संघ बनला आहे. टीम इंडियाने या वर्षातील 21 वी टी-20 जिंकले आहेत. यामध्ये भारताने पाकिस्तानलाही मागे टाकले आहे. 2021 मध्ये एका कॅलेंडर वर्षात पाकिस्तानने 20 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले होते. भारतापूर्वी, जगातील कोणत्याही संघाने एका वर्षात 20 पेक्षा अधिक टी-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकलेले नाहीत.

भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. 2022 मध्ये आतापर्यंत टीम इंडियाने 29 पैकी 21 टी-20 सामने जिंकले आहेत. यावर्षाला अद्याप 10 महिनेही पूर्ण झालेले नाहीत. अशा परिस्थितीत टीम इंडिया आपला विक्रम आणखी वाढवू शकतो. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाला 4 विकेटने पराभव स्वीकारावा लागला होता, मात्र, त्यानंतर भारतीय संघाने मालिका जिंकली. २०२२ च्या टी-२० विश्वचषकापूर्वी टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धही मालिका खेळायची आहे.

दरम्यान, भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-१ ने जिंकली. तिसऱ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांनी भारतासाठी शानदार कामगिरी केली. या दोघांच्या फलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियन गोलंदाज टिकू शकले नाहीत. यानंतर हार्दिक पांड्यानेही डेथ ओव्हर्समध्ये 16 चेंडूत 25 धावांची तुफानी खेळी केली आणि टीम इंडियाने हा सामना 4 विकेटने जिंकला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com