ICC World Cup
ICC World CupTeam Lokshahi

ICC World Cup : तब्बल इतक्या वेळा विश्वचषकात भिडले भारत - पाकिस्तान; भारताचा हा रेकॉर्ड बघून व्हाल थक्क !

कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत- पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला सामना होणार आहे.
Published by :
Sagar Pradhan

क्रिकेट प्रेमींमध्ये सध्या आनंद संचारला आहे. त्याचे कारण असे की क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच क्रिकेट विश्वचषक 2023 स्पर्धेला 5 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे या विश्वचषकाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच कट्टर प्रतिस्पर्धी समजले जाणारे भारत- पाकिस्तान यांच्यात 15 ऑक्टोबरला सामना होणार आहे. त्यामुळे जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या नजरा या सामन्याकडे आहेत. दरम्यान, याआधी विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही किती वेळा एकमेकांविरोधात उभा ठाकले ते जाणून घ्या. भारत आणि पाकिस्तानमध्ये विश्वचषकात सात वेळा भिडले. त्यामध्ये कोणता संघ किती वेळा विजयी झाला ते जाणून घ्या.

1992 - सिडनी

भारताने 43 धावांनी विजय मिळवला.

1996 - बंगलोर

भारताने 39 धावांनी विजय मिळवला.

1999 - मँचेस्टर

भारताने 47 धावांनी विजय मिळवला.

2003 - सेंच्युरियन

भारताने 6 विकेटने विजय मिळवला.

2011 – मोहाली

भारताने हा सामना 29 धावांनी जिंकला आणि अंतिम फेरीत श्रीलंकेचा पराभव करून ट्रॉफीवर नाव कोरले.

2015 - अॅडलेड

भारताने हा सामना 76 धावांनी जिंकला.

2019 - मँचेस्टर

भारतीय संघाने पाकिस्तानचा 89 धावांनी (डी/एल पद्धत) पराभव केला.

यासह भारताने विश्वचषकात 7-0 अशी आघाडी घेतली. त्यामुळे आता या विश्वचषकात 8-0 ने आघाडी घेईल का? हे बघणे महत्वाचे असणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com