Asia Cup 2023 : आज पुन्हा रंगणार भारत विरुध्द पाकिस्तानचा थरार
कोलंबो : आशिया कप 2023 मध्ये आज दुसऱ्यांदा भारत आणि पाकिस्तान यांच्यात आमने-सामने येणार आहे. सुपर-4 फेरीचा हा सामना श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथे भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता खेळवला जाईल. आज हा सामना फलंदाजांसाठी लिटमस टेस्ट असणार आहे. विशेषत: भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली, पाकिस्तानी वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ आणि नसीम शाह यांच्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात.
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांकडे उत्कृष्ट वेगवान गोलंदाज आहेत. पाकिस्तानी संघात शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ, नसीम शाह आणि फहीम अश्रफसारखे स्टार वेगवान गोलंदाज आहेत. शाहीनने भारताविरुद्धच्या गेल्या सामन्यात 4 बळी घेतले होते. तर नसीम आणि हरिस यांनी प्रत्येकी 3 यश मिळविले होते.
दुसरीकडे, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह भारतीय संघात पुनरागमन करणार आहे. त्याच्याशिवाय मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराज यांना संधी मिळू शकते. शार्दुल ठाकूरही खेळताना दिसणार आहे. अशा प्रकारे संघात 3 वेगवान गोलंदाज असू शकतात. तर चौथा वेगवान गोलंदाज म्हणून अष्टपैलू हार्दिक पंड्या आपली जादू दाखवताना दिसणार आहे.
पाकिस्तान संघाने एक दिवस आधी या सामन्यासाठी आपला प्लेइंग-11 जाहीर केला आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी प्लेइंग-11 मध्ये बदल झाला आहे. मोहम्मद नवाज भारताविरुद्धच्या ग्रुप स्टेज मॅचमध्ये खेळताना दिसला होता. आता दुसऱ्या सामन्यात नवाजच्या जागी फहीम अश्रफला स्थान मिळाले आहे. अशा प्रकारे पाकिस्तानने आपल्या वेगवान गोलंदाजीची धार आणखीनच धारदार केली आहे.
पाकिस्तानचे प्लेइंग-11:
बाबर आझम, फखर जमान, इमाम उल हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, मोहम्मद रिझवान, शादाब खान, फहीम अश्रफ, हरिस रौफ, नसीम शाह आणि शाहीन शाह आफ्रिदी.
भारताचे संभाव्य प्लेइंग-11:
रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल/इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी/मोहम्मद सिराज.