टीम इंडियाचं स्वप्न भंगलं! कसोटीमध्ये आफ्रिकेकडून 32 धावांनी पराभव

टीम इंडियाचं स्वप्न भंगलं! कसोटीमध्ये आफ्रिकेकडून 32 धावांनी पराभव

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथे खेळवला गेला आहे.

नवी दिल्ली : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथे खेळवला गेला आहे. साऊथ आफ्रिका संघाने पहिल्याच कसोटी सामन्यामध्ये टीम इंडियाला पराभूत केलं आहे. या पराभवामुळे भारत कसोटी मालिकेत 0-1 ने पिछाडीवर पडला आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न पुन्हा भंगले.

टीम इंडिया आणि साऊथ आफ्रिकेमधील पहिल्या कसोटी सामन्यात आफ्रिका संघाने एक डाव आणि 32 धावांनी विजय मिळवला आहे. आफ्रिकेने घेतलेल्या 163 धावांच्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात बॅटींगला उतरलेल्या टीम इंडिया 131 वर ऑल आऊट झाली. तिसऱ्या दिवशीच टीम इंडियाचा आफ्रिकेने सुफडा साफ केला आहे. कगिसो रबाडाने आणि नांद्रे बर्गर यांच्यासमोर टीम इंडियाने गुडघे टेकले. या विजयासह दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत आफ्रिका संघाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेचा संघ 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिकेतील दुसरी कसोटी ३ जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. केपटाऊनमध्ये दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाला केपटाऊन कसोटी जिंकून मालिका बरोबरीत संपवायची आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com