India Vs. Sri Lanka 3rd T-20 Live Updates: भारतीय संघाकडून श्रीलंकेच्या संघाला क्लीन स्वीप

India Vs. Sri Lanka 3rd T-20 Live Updates: भारतीय संघाकडून श्रीलंकेच्या संघाला क्लीन स्वीप

Published by :
Vikrant Shinde

भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या T-20 मालिकेपैकी तिसरा टी20 (3rd T20) सामना आज खेळवला जाणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने भारताने आधीच जिंकल्यामुळे मालिकेत (India won Series) विजय मिळवला आहे. पण आज भारताला श्रीलंकेला क्लीन स्वीप करण्याची उत्तम संधी आहे. तर दुसरीकडे श्रीलंका शेवटचा सामना किमान जिंकून शेवट गोड करण्यासाठी मैदानात उतरेल.

ह्या सामन्यासाठी झालेला टॉस जिंकत श्रीलंकेने आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामना आज सायंकाळी 7:00 वाजता सुरू झाला. पहिल्याच षटकात मोहम्मद सिराजच्या चेंडूवर दनुष्का गुणथिलक बाद झाला. त्यामुळे भारतीय संघाला एक उत्तम सुरूवात मिळाली आहे. तर, दुसऱ्याच षटकात आवेश खानच्या चेंडूवर पथुम निसानकाचा झेल वेंकटेश अय्यरने झेलला.

तिसऱ्या षटकात चरित असलांकाने मोहम्मद सिराजच्या चेंडूवर चाैकार मारल्याने श्रीलंकन खेळाडूंच्या मनावरील ताण किंचीत कमी झाला. परंतू, त्यानंतरच्याच षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर संजू सॅमसनने झेल पकडत असलांकाला बाद केलं.

यानंतर नवव्या षटकापर्यंत दिनेश चांदीमल व जनिथ लियानागे यांनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला परंतू, नवव्या षटकांत रवी बिश्नोईच्या चेंडूवर जनिथ लियानागे बाद झाला. पहिल्या 10 षटकांत श्रीलंकेचा संघ 4 बाद 43 इतक्याच धावा करू शकला. तेराव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर दिनेश चांदीमल बाद झाला. त्यानंतर दसुन शनाका व चमिका करुणारत्ने ह्यांच्या भागीदारीच्या बळावर श्रीलंकेचा संघ 18व्या षटका अखेरीस 5 बाद 115 अश्या अवस्थेत.

20व्या षटका अखेरीस श्रीलंकन संघाची एकूण धावसंख्या 146 असल्याने श्रीलंकन संघाने भारतीय संघासमोर 147 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.

फलंदाज श्रेयस अय्यरने पुन्हा एकदा अर्धशतक झळकवलं आहे. 29 चेंडूत 50 धावा करत त्याने अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या ह्याच खेळीमुळे भारतीय संघ 15 षटकांच्या अखेरीस 4 बाद 123 अश्या स्थितीत आहे. भारतीय संघाला विजयासाठी 20 चेंडूत 3 धावांची गरज असताना श्रेयस अय्यरने खेचलेल्या चाैकाराने भारताला विजयी केलं.

रोहीत ब्रिगेडने वेस्ट इंडीज पाठोपाठ श्रीलंकेलाही क्लीन स्वीप केलं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com