India vs West Indies 2022 : आज विंडीजविरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला  विजयाचे ध्येय

India vs West Indies 2022 : आज विंडीजविरुद्ध ट्वेन्टी-२० सामन्यात भारताला विजयाचे ध्येय

आज पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी सलामीचे ध्येय आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून त्यापूर्वी भारताला साधारण १६ ट्वेन्टी-२० सामने खेळण्याची संधी मिळणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आज पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारताला वेस्ट इंडिजविरुद्ध विजयी सलामीचे ध्येय आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक असून त्यापूर्वी भारताला साधारण १६ ट्वेन्टी-२० सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. या सामन्यात भारताचा यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कामगिरीवर लक्ष राहणार आहे. विंडीजचे खेळाडू ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी ओळखले जातात. मात्र भारताला पाच सामन्यांत त्यांना हरवण्यासाठी त्यांच्या कामगिरीवर ठाम राहायला लागणार आहे.

कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा संघबांधणीचा प्रयत्न असेल.५० ट्वेन्टी-२० सामन्यांत त्याने केवळ २२.५८च्या सरासरीने ७६८ धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत त्याला सलामीवीर म्हणून खेळताना दोन सामन्यांत २७ धावाच करता आल्या. रोव्हमन पॉवेल आणि ब्रँडन किंग यांच्यावर असेल. गोलंदाजीत जेसन होल्डरच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात अनुभवी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विनला पुनरागमनाची संधी मिळू शकेल. अश्विनने गेल्या नोव्हेंबरपासून ट्वेन्टी-२० सामना खेळलेला नाही. मात्र आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या दृष्टीने त्याला या मालिकेसाठी संघात स्थान मिळाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com