IND Vs. WI: एक-दिवसीय मालिकेनंतर आता T-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याची टीम इंडीयाला संधी

IND Vs. WI: एक-दिवसीय मालिकेनंतर आता T-20 मालिकेतही वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप देण्याची टीम इंडीयाला संधी

Published by :
Vikrant Shinde

वेस्ट इंडीज विरूद्ध झालेल्या एक-दिवसीय मालिकेत भारताने वेस्ट इंडीजला क्लीन स्वीप दिल्यानंतर आता सुरू असलेल्या T-20 मालिकेमधील 3 पैकी 2 सामने भारताने जिंकून मालिका आधीच खिशात घातली आहे. ह्या मालिकेतील तीसरा सामना आज कोलकात्यातील ईडन गार्डन स्टेडीयमवर खेळवला जाणार आहे.

आज होणारा तिसरा सामनाही जिंकून भारत वेस्ट इंडिजला क्लीन स्वीप देण्याचा प्रयत्न करणार आहे. भारताने शुक्रवारी झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यांत वेस्टइंडिजचा 8 धावांनी पराभव केला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वातील सलग तिसऱ्या मालिकेत भारताने विजय मिळवला. ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकाला आता फक्त आठ महिने उरले आहेत. त्यामुळे कर्णधार रोहित शर्मा व मॅनेजमेंट या सामन्यात नवीन खेळाडूंना संधी देऊन त्यांचा खेळ समजून घेण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com