IND vs SA ICC World Cup 2023 : भारतीय गोलंदाजांचा पुन्हा धुरळा, बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी मात

IND vs SA ICC World Cup 2023 : भारतीय गोलंदाजांचा पुन्हा धुरळा, बलाढ्य दक्षिण आफ्रिकेवर 243 धावांनी मात

टीम इंडियाने विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला आहे.
Published by :
shweta walge

टीम इंडियाने विश्वचषकात ऐतिहासिक कामगिरी करत सलग आठवा विजय नोंदवला आहे. भारताने दक्षिण आफ्रिके विरुद्ध तब्बल २४३ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपली विजयी घौडदौड कायम ठेवली आहे. या विजयाने टीम इंडियाचे गुणतालिकेतील अव्वल स्थान कायम राखले आहे.

रोहित शर्माच्या  नेतृत्वात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकावर विजय मिळवलाय.  टीम इंडियाचा हा या 13 व्या वनडे वर्ल्ड कपमधील सलग 8 वा विजय ठरला आहे. जडेजा आणि कोहली या जोडीने भारताच्या विजयात सर्वाधिक योगदान दिलं.

भारताने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 5 बाद 326 धावा केल्या. विराट कोहलीने आपले ऐतिहासिक 49 वे वनडे शतक ठोकले. त्याने नाबाद 101 धावा केल्या तर श्रेयस अय्यरने 77 धावांचे योगदान दिले. रोहित शर्माने सुरूवातीला आक्रमक फलंदाजी करत 40 धावा केल्या. तर स्लॉग ओव्हरमध्ये रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 29 धावा चोपल्या. सूर्यकुमार यादवने 22 तर शुभमन गिलने 23 धावांचे योगदान दिले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com