Abhishek Sharma
ABHISHEK SHARMA HAT-TRICK OF ZEROS T20 WORLD CUP 2026 RECORD

Abhishek Sharma: क्रिकेट इतिहासात अभिषेक शर्माची शून्याची हॅटट्रीक, टी20 वर्ल्डकपमध्ये एक वेगळा विक्रम

T20 World Cup 2026: टी20 वर्ल्डकप २०२६ मध्ये अभिषेक शर्माने सलग तीन सामन्यांत शून्यावर बाद होऊन अनपेक्षित विक्रम नोंदवला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

टी२० क्रिकेटमध्ये जगातील नंबर वन फलंदाज म्हणून ओळखला जाणारा भारताचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या करिअरातील सर्वात वाईट काळाचा सामना करत आहे. टी२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत त्याने तीन सलग सामने खेळले आणि प्रत्येक सामन्यात शून्यावर बाद होऊन जगातील सर्वात 'कमनशिबी' फलंदाज बनला आहे. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या या तीन सामन्यांत त्याला एकही धाव करता आली नाही, ज्यामुळे संघात त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

स्पर्धेपूर्वी अभिषेकची बॅट तळपत होती आणि क्रीडातज्ज्ञ त्याला भारताचे ट्रम्प कार्ड म्हणत होते. न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेपासून त्याच्या फॉर्मला ग्रहण लागले असून, सराव सामन्यांपासूनच स्ट्राईक रेट आणि खेळण्याची शैली चिंतेचा विषय ठरली होती. मागील सात डावांत पाच वेळा शून्यावर बाद होणारा हा तरुण खेळाडू आता केएल राहुलला मागे टाकून भारतीय टी२० खेळाडूंपैकी सर्वाधिक शून्य (सहा) नोंदवणारा बनला आहे. रोहित शर्मा दहा शून्यांसह आघाडीवर आहे, पण त्यांचे १२४ डावांच्या तुलनेत अभिषेकचे ३८ डाव हे प्रमाण भयावह आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com