राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : १९ वर्षीय भारतीय कुस्तीपटूने चारली पाकिस्तानी पैलवानाला धूळ!

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : १९ वर्षीय भारतीय कुस्तीपटूने चारली पाकिस्तानी पैलवानाला धूळ!

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सध्या सुरु आहे. या स्पर्धेत कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. रवी दहिया आणि विनेश फोगटनंतर भारतासाठी कुस्तीतील सहावे सुवर्णपदक नवीन मलिकने जिंकले आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा सध्या सुरु आहे. या स्पर्धेत कुस्तीपटूंनी दमदार कामगिरी केली आहे. रवी दहिया आणि विनेश फोगटनंतर भारतासाठी कुस्तीतील सहावे सुवर्णपदक नवीन मलिकने जिंकले आहे. नवीन मलिक या १९ वर्षीय भारतीय कुस्तीपटूने पुरुषांच्या ७४ किलो वजनी गटात सुवर्ण जिंकले. नवीनने पाकिस्तानच्या मुहम्मद शरीफ ताहिरचा ९-१ च्या पराभव करून पदक जिंकले.

नवीनचा पहिला प्रतिस्पर्धी नायजेरियाचा ओबोना इमॅन्युएल जोहान होता. नवीनने त्याला अवघ्या पाच मिनिटांत पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली होती. २०२२ ‘सीनियर आशियाई चॅम्पियनशिप’मध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे नवीनला राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होता आले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा : १९ वर्षीय भारतीय कुस्तीपटूने चारली पाकिस्तानी पैलवानाला धूळ!
CWG 2022 : कुस्तीत भारताची पदकांची लयलूट; बजरंग, साक्षी, दीपकची सुवर्ण कामगिरी
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com