IPL 2021 Auction Live ; ‘या’ खेळाडूंवर लागलीय तगडी बोली

IPL 2021 Auction Live ; ‘या’ खेळाडूंवर लागलीय तगडी बोली

Published by :
Published on

IPL 2021च्या लिलावाला सुरुवात झाली असून ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टीव्ह स्मिथला दिल्ली संघाने २ कोटी २० लाखांच्या किमतीला खरेदी केले आहे. त्यामुळे तो दिल्ली संघाकडून मैदानात उतरणार आहे.

मॉरिस सर्वात महागडा खेळाडू

दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज ख्रिस मॉरिस इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. मॉरिससाठी ७५ लाखांची मूळ किंमत होती. मॉरिसवर मुंबईने बोली लावली होती पण अखेर १६ कोटी २५ लाखांत तो राजस्थानच्या संघात गेला. त्यामुळे इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे'.

भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादव हा एक कोटींच्या बोलीत दिल्लीच्या संघात दाखल झाला.तसेच मुंबईने करारमुक्त केलेल्या नॅथन कुल्टर नाइलला पुन्हा मुंबईनेच त्याला ५ कोटींना संघात विकत घेतलं.ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनवर तब्बल १४ कोटींची बोली लागली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज एडम मिल्न याला मुंबईने ३ कोटी २० लाखांना विकत घेतलं.अष्टपैलू शिवम दुबेसाठी ५० लाखांची होती मूळ किंमत होती, पण राजस्थानच्या संघाने ४.४० कोटींच्या रकमेला विकत घेतलं. फलंदाज डेव्हिड मलान मूळ किमत असलेल्या १.५० कोटींना पंजाब किंग्ज संघात दाखल झाला.

ग्लेन मॅक्सवेलला बंगळुरूने खरेदी केले आहे. चेन्नई आणि बंगळुरू यांच्यात रंगलेल्या स्पर्धेत अखेर १४.२५ कोटींना बंगळुरूने त्याला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतले. तर बांगलादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसनला कोलकाताच्या संघाने त्याला ३ कोटी २० लाखांची बोली लावून विकत घेतलं.बंगळुरू संघात असणारा अनुभवी फिरकीपटू मोईन अली चेन्नईच्या ताफ्यात दाखल झाला आहे. २ कोटींची मूळ किमत असलेल्या अलीला धोनीच्या चेन्नईने त्याला ७ कोटींच्या बोलीला विकत घेतलं.

अनसोल्ड खेळाडू

मराठमोळा फदाज केदार जाधव, ऑस्ट्रेलियाचा टी-२० कर्णधार आरोन फिंच, हनुमा विहारी, इंग्लंडचा दमदार सलामीवीर जेसन रॉय, इग्लंडचा वरच्या फळीतील फलंदाज अलेक्स हेल्स व भारताचा करूण नायर, ऑस्ट्रेलियाचा किपर अलेक्स कॅरी, इंग्लंडचा सॅम बिलिंग्स आणि श्रीलंकेचा अष्टपैलू कुसल परेरा या खेळाडूंना कोणीही विकत घेतले नाही.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com