IPL 2026 AUCTION: MUMBAI INDIANS SIGN QUINTON DE KOCK AS ROHIT SHARMA’S OPENING PARTNER
IPL 2026 Auction

IPL 2026 Auction : मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज सौदा! रोहित शर्मासोबत नवा गेमचेंजर, कोट्यवधींची डील

Mumbai Indians: IPL 2026 मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने क्विंटन डी कॉकला बेस प्राइस 1 कोटींमध्ये संघात सामील करत मोठा डाव खेळला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

IPL 2026 साठी अबू धाबी येथे सुरू असलेल्या मिनी ऑक्शनमध्ये मुंबई इंडियन्सने मोठा डाव खेळत दक्षिण आफ्रिकेच्या स्टार यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉकला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. मुंबई इंडियन्सने डी कॉकला त्याच्या बेस प्राइस 1 कोटी रुपयांमध्ये खरेदी करून चाहत्यांना आनंदाची चांगली बातमी दिली. मागील हंगामात कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळणारा डी कॉक आता पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या जर्सीत मैदानावर उतरणार आहे.

IPL 2026 AUCTION: MUMBAI INDIANS SIGN QUINTON DE KOCK AS ROHIT SHARMA’S OPENING PARTNER
Jio Cheapest Recharge: नवीन वर्षाची धमाकेदार सुरुवात! कमी किमतीत जबरदस्त प्लॅन, फायदे पाहून चकित व्हाल

डी कॉक यापूर्वी मुंबई इंडियन्सकडून खेळला असून, त्याचा संघासोबतचा अनुभव यशस्वी ठरला होता. विशेषतः 2019 आणि 2020 च्या हंगामात त्याने संघाला IPL जेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. आता IPL 2026 साठी रोहित शर्मासोबत सलामीला खेळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मुंबई इंडियन्सच्या बॅटिंग लाइनअपला मजबुती मिळेल. या मिनी ऑक्शनमध्ये सुमारे 350 खेळाडूंवर बोली लावली जात असून, डी कॉकने स्वतःची बेस प्राइस 1 कोटी ठेवली होती. त्याचे नाव पुकारताच मुंबईने थेट बेस प्राइसवर बोली लावली.

IPL 2026 AUCTION: MUMBAI INDIANS SIGN QUINTON DE KOCK AS ROHIT SHARMA’S OPENING PARTNER
IPL 2026 Auction : IPL 2026 ची रणधुमाळी सुरू! आज रंगणार खेळाडूंचा लिलाव, कोणावर लागणार सर्वात मोठी बोली?

क्विंटन डी कॉकची IPL कारकिर्द अत्यंत प्रभावी राहिली आहे. त्याने आतापर्यंत 115 सामने खेळत 3309 धावा केल्या असून, यात 2 शतके आणि 24 अर्धशतके सामील आहेत. त्याची सरासरी 30.64 आणि स्ट्राइक रेट 134.02 इतका जबरदस्त आहे. डी कॉकने सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स, मुंबई इंडियन्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाइट रायडर्स अशा संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याचा IPLमधील सर्वोच्च स्कोअर नाबाद 140 धावा असून, ही खेळी त्याने 2022 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सकडून कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध साकारली होती.

IPL 2026 AUCTION: MUMBAI INDIANS SIGN QUINTON DE KOCK AS ROHIT SHARMA’S OPENING PARTNER
Donald Trump : लाडका अमेरिकन योजना! नागरिकांच्या खात्यात थेट पावणे दोन लाख रुपये, डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा

या खरेदीनंतर चाहते उत्साही झाले असून, डी कॉक पुन्हा रोहितसोबत सलामी देत फटकेबाजीने धमाल मचवेल, अशी अपेक्षा आहे. IPL 2026 साठी मुंबई इंडियन्सचा हा स्मार्ट मूव संघाला मजबूत करेल.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com