क्रीडा
ENG vs IND 4th Test : जसप्रीत बुमराहची कमाल; इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीर तंबूत
केनिंग्टनच्या ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी आजपासून सुरू झाली आहे. या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ख्रिस वोक्स, ओली रॉबिन्सन यांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडने भारताला ६१.३ षटकात १९१ धावांत गारद केले. आज संधी मिळालेल्या मुंबईकर शार्दुल ठाकूरचे झटपट अर्धशतक टीम इंडियाला दोनशे धावांच्या जवळ घेऊन गेले. कर्णधार विराट कोहलीने अर्धशतकी योगदान दिले. दुखापतीतून सावरलेल्या ख्रिस वोक्सने ४ बळी घेत आपले पुनरागमन यशस्वी केले आहे. पाच सामन्यांची ही मालिका सध्या १-१ने बरोबरीत आहे.