KKR vs SRH, IPL 2024 Final Match
KKR vs SRH, IPL 2024 Final Match

IPL 2024 Final, SRH vs KKR : कोलकातानं जिंकली आयपीएलची तिसरी ट्रॉफी, गुरबाज-अय्यरच्या धमाक्याने SRH चा उडवला धुव्वा

व्यंकटेश अय्यरने धडाकेबाज फलंदाजी करून नाबाद अर्धशतकी खेळी केली. अय्यरने २६ चेंडूत नाबाद ५२ धावा करुन कोलकाताला दणदणीत विजय मिळवून दिला.
Published by :

KKR Wins IPL 2024 Final : आयपीएल २०२४ चा फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये रंगला. हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात उतरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी सनरायजर्स हैदराबादची दाणादाण उडवली. कोलकाताच्या सर्वच गोलंदाजांनी भेदक मारा करून हैदराबादच्या फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं आणि एसआरएचचा संपूर्ण संघ ११३ धावांवर गारद केला. त्यामुळे यंदाचा आयपीएलचं जेतेपद जिंकण्यासाठी कोलकाता नाईट रायडर्ससमोर ११४ धावांचं लक्ष्य होतं. त्यानंतर केकेआरचे धडाकेबाज फलंदाज रहमनुल्ला गुरबाज (३९ ) आणि व्यंकटेश अय्यरने धडाकेबाज फलंदाजी करून नाबाद अर्धशतकी खेळी केली. अय्यरने २६ चेंडूत नाबाद ५२ धावा करुन कोलकाताला दणदणीत विजय मिळवून दिला.

११४ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. व्यंकटेश अय्यरने हैदराबादच्या गोलंदाजांची पुरती दमछाक केली. गुरबाजने ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या जोरावर ३९ धावा केल्या. तर अय्यरने २६ चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या जोरावर नाबाद ५२ धावा केल्या.

११४ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या केकेआरच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. व्यंकटेश अय्यरने हैदराबादच्या गोलंदाजांची पुरती दमछाक केली. गुरबाजने हैदराबादचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने पॉवर प्ले मध्ये अभिषेक शर्मा (२) आणि राहुल त्रिपाठी (९) धावांवर बाद करून हैदराबादला मोठा धक्का दिला.

त्यानंतर आंद्रे रसलने ३, हर्षीत राणा २, वैभव अरोरा १, सुनील नारायण १ आणि वरुण चक्रवर्तीनेही एका विकेट घेत हैदराबादच्या संघाला दणका दिला. हैदराबादसाठी कर्णधार पॅट कमिन्सने सर्वाधिक २४ धावा केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com