Lionel Messi : लिओनेल मेस्सी आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर; मुंबईत होणार मेस्सीचं जंगी स्वागत
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Lionel Messi) जगप्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी भारत दौऱ्यावर येणार आहे. आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येणार असून मुंबईत मेस्सीचं जंगी स्वागत करण्यात येणार आहे.
कोलकात्यातील पहिला दिवस मेस्सी विविध कार्यक्रम आणि चाहत्यांशी संवाद साधणार आहे. 2011 नंतर मेस्सीचा हा पहिलाच भारत दौरा असून कोलकाता, हैदराबाद, मुंबई आणि नवी दिल्लीत मेस्सी भेट देणार आहे. 13, 14 आणि 15 डिसेंबर रोजी तो भारतात असेल. यावेळी मेस्सी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही भेटेल.
विशेष म्हणजे मेस्सीचे सहकारी लुईस सुआरेझ आणि रॉड्रिगो डी पॉल हे देखील या दौऱ्यात असणार आहेत. चाहते त्याला भेटण्यासाठी उत्सुक आहेत. मेस्सी चार प्रमुख शहरांना भेट देणार आहे. लिओनेल मेस्सीच्या या भारत दौऱ्याकडे सर्व चाहत्यांचे लक्ष लागले आहे.
Summery
फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी आजपासून तीन दिवसीय भारत दौऱ्यावर
2011 नंतर मेस्सीचा हा पहिलाच भारत दौरा
मेस्सी चार प्रमुख शहरांना भेट देणार
