IPL 2021 |आबू धाबीत आज MI vs SHR तर दुबईत RCB vs DC सामना

IPL 2021 |आबू धाबीत आज MI vs SHR तर दुबईत RCB vs DC सामना

Published by :

आयपीएलमध्ये आज एकाच वेळी दोन सामने खेळवले जाणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स सामना अबू धाबी येथे सुरु होणार आहे. तर त्याचवेळी दुबईच्या मैदानामध्ये रॉयल चँलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आमने-सामने असतील.

बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच नियोजित वेळापत्रकामध्ये बदल करत दुपारी साडेतीनचा मुंबई हैदराबाद सामना पुढे ढकलत एकाचवेळी दोन वेगळ्या मैदानांवर सामने खेळवण्याचं निर्णय घेतला.आयपीएलचे शेवटचे दोन साखळी सामने राहिले असले तरी अंतिम चार संघ आणि त्यांचं स्थान या सामन्यांवर अवलंबून असल्याने आधी झालेल्या सामन्याचा चुकीच्या अर्थाने एखाद्या संघाला फायदा होऊ नये म्हणून सामने एकाच वेळी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

सामना कुठे पाहता येणार?
५५ वा सामना – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध मुंबई इंडियन्स
कुठे दाखवला जाणार? – स्टार स्पोर्ट्स २, स्टार स्पोर्ट्स ३, स्टार गोल्ड २, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट
लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप – डिस्ने-हॉटस्टार

५६ वा सामना – रॉयल चँलेंजर्स बंगळुरु विरुद्ध दिल्ली कॅपीटल्स
कुठे दाखवला जाणार? – स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स १ हिंदी, स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट १, तेलगू/तमीळ/कन्नड
लाइव्ह स्ट्रीमिंग अॅप – डिस्ने-हॉटस्टार

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com