क्रीडा
Mumbai Indians Vs Sunrisers Hyderabad | 'मुंबई'ची लोकल सुस्साट... सनरायजर्स हैदराबादचा वानखेडेवर पराभव
मुंबई इंडियन्सने 4 गडी राखून आयपीएलच्या 18 व्या मोसमातील तिसरा विजय मिळवला आहे.
मुंबई इंडियन्सने 4 गडी राखून आयपीएलच्या 18 व्या मोसमातील तिसरा विजय मिळवला आहे. या विजयानंतर पॉइंट्स टेबलमध्येही सुधारणा झाली आहे. सनरायजर्स हैदराबादने मुंबईला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं.
मुंबईने 166 धावा केल्या. हैदराबादने 5 विकेट्स गमावून 162 धावा केल्या. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांनी 26-26 धावा केल्या. हार्दिक पंड्या याने 21 रन्स केले. विल जॅक्स याने सर्वाधिक 26 बॉलमध्ये 36 धावा केल्या.
हैदराबादचा हा या मोसमातील पाचवा पराभव ठरला असून मुंबई येथील वानखेडेच्या घरच्या मैदानात रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघानं सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत विजय मिळवला.