Mirabai Chanu | commonwealth games 2022
Mirabai Chanu | commonwealth games 2022team lokshahi

Mirabai Chanu : मीराबाईने राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले पहिले सुवर्णपदक

भारताचे यंदाचे हे पहिले सुवर्णपदक
Published by :
Team Lokshahi

Mirabai Chanu : राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला पहिले सुवर्ण मिळाले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानूने देशासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. मीराबाईने ४९ किलो वजनी गटात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. भारताचे यंदाचे हे पहिले सुवर्णपदक आहे. (mirabai chanu won first gold for india in the commonwealth games 2022)

Mirabai Chanu | commonwealth games 2022
Hariyali Teej 2022 : उद्याचा हरियाली तीजचा उपवास चुकवू नका, जाणून घ्या पुजेचा मुहुर्त आणि महत्त्व

मीराबाई चानूचे सुवर्णपदक

मीराबाईने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील ४९ किलो वजनी गटात एकतर्फी सुवर्णपदक पटकावले आहे. इतर देशांतील खेळाडू आज मीराबाईच्या आसपासही नव्हते. मग त्या स्नॅच असो वा क्लीन अँड जर्क. मीराबाई इतर खेळाडूंच्या तुलनेत खूप पुढे होत्या. मीराबाईने स्नॅचमध्ये 88 किलो वजन उचलले. क्लीन अँड जर्कमध्ये एकूण 113 किलो वजन उचलले. अशा प्रकारे त्यांची एकूण 201 गुण संख्या झाली. एवढेच नाही तर मीराबाईने राष्ट्रकुल विक्रमासह हे सुवर्णपदक जिंकले आहे.

Mirabai Chanu | commonwealth games 2022
Traffic Rules : वाहतूक पोलिस अशा दुचाकींना ठोठावतात दंड, तुम्हीही चूक करताय का?

भारताचे पहिले सुवर्ण

राष्ट्रकुल 2022 मधील भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे. यासह भारताच्या खात्यात आता एकूण 3 पदके झाली आहेत. ही तिन्ही पदके फक्त वेटलिफ्टिंगमध्ये आली आहेत. मीराबाईपूर्वी संकेत महादेवने रौप्य आणि गुरुराज पुजारीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com