Mohammed Siraj AUS vs IND: सिराज भडकला ना! लाबुशेनने असं काय केल की, संतापाच्या भरात सिराजने फेकला चेंडू अन्...
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशा काही घटनांची पुनरावृत्ती होते, जिथे मैदानावर खेळाडू एकमेकांना तोंडी किंवा शारीरिकदृष्ट्या समोरासमोर येतात. सिराजने सुस्पष्टपणे त्याच्या भावनांना नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला, पण लाबुशेनची काही वागणूक त्याच्या नियंत्रणाबाहेर गेली, ज्यामुळे त्याने चेंडू उचलला आणि तसाच त्याच्या दिशेने जोरात फेकला.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये खेळवला जात आहे. ॲडलेडमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पिंक बॉल कसोटी नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला. प्रथम फलंदाजी करताना, भारतीय संघाचा पहिला डाव अवघ्या 180 धावांवर पार पडला.
ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनीची हे दोघे मैदानात उतरले दरम्यान बुमराहने टाकलेल्या चेंडूवर रोहित शर्माने उस्मान ख्वाजाला 35 बॉल आणि 13 धावांसह शानदार झेल घेत बाद केले. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मार्नस लाबुशेन आला आणि मॅकस्विनीसह त्याने संघाला चांगली सुरुवात करुन दिली.
लाबुशेनची 'ती' कृती आणि सिराज भडकला
ऑस्ट्रेलियाची या खेळीदरम्यान मजबूत पकड झाली होती त्यावेळी ऑस्ट्रेलियाच्या डावातील 25 वे षटक टाकण्यासाठी भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज रन-अप घेत चेंडू टाकण्यासाठी येत होता, त्यावेळी साइड स्क्रीनच्या समोर एक व्यक्ती मैदानात उतरला होता. ओव्हरमधील अखेरचा चेंडू टाकण्यासाठी सिराज पुर्णपणे तयार होता मात्र चेंडू टाकण्याआधीच लाबुशेनने सिराजला अचानक थांबवले.
मात्र सिराजला हे आवडले नाही, आधीच ऑस्ट्रेलियाची जबरदस्त खेळी पाहून भारतीय संघ तणावात होता. यादरम्यान चेंडू फेकत असताना लाबुशेनने सिराजला अनाचक ब्रेक लावलेल्याने सिराजने संयम गमावला आणि त्याच संतापात सिराजने चेंडू जोरात लाबुशेनच्या दिशेने फेकला एवढेच नाही तर लाबुशेनकडे पाहून सिराजने स्लेजिंग देखील केले. या प्रकारानंतर सिराजने टाकलेल्या ऑफ- स्टंपच्या बाहेरील एका शॉर्ट चेंडूवर लाबुशेनने कडकडीत शॉट मारत सिराजला जोरदार प्रत्युत्तर दिलं.