पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव आज दुबई येथे झाला. यामध्ये पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

IPL 2024 Auction : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2024 साठी खेळाडूंचा लिलाव आज दुबई येथे झाला. यामध्ये पॅट कमिन्सला सनरायझर्स हैदराबादने 20.50 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. अशाप्रकारे पॅट कमिन्स हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कमिन्सला विकत घेण्यासाठी आरसीबीनेही मोठी बोली लावली होती, पण सनरायझर्सने बाजी मारली.

पॅट कमिन्स ठरला आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू
IPL 2024 Auction Updates LIVE : आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू पॅट कमिन्स हैदराबादच्या टीममध्ये

पॅट कमिन्सने या वर्षी ऑस्ट्रेलियाच्या दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. पॅट कमिन्स हा डब्लूटीसी फायनल 2023 चा विजेता कर्णधार देखील होता, तर अलीकडेच विश्वचषक 2023 फायनलचा विजेता देखील पॅट कमिन्स होता.

जाणून घ्या आयपीएलच्या इतिहासातील महागड्या खेळाडूंबद्दल

1. इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन (18.50 कोटी रुपये)

2. ऑस्ट्रेलियाच्या स्टार खेळाडू कॅमेरॉन ग्रीन (17.50 कोटी रुपये

3. इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्स (रु. 16.25 कोटी)

तर, टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग हा लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. युवराजला दिल्ली डेअरडेव्हिल्सने 16 कोटींना विकत घेतले होते. मात्र, 2015 च्या मोसमात युवराज काही विशेष करू शकला नाही. त्याला 14 सामन्यांत 19 च्या सरासरीने केवळ 248 धावा करता आल्या. पुढील हंगामापूर्वी युवराजला फ्रँचायझीने सोडले. युवराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com