IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वीच मुंबई पोलिसांना धमकी

IND vs NZ सेमीफायनल सामन्यापूर्वीच मुंबई पोलिसांना धमकी

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वीच मुंबई पोलिसांना धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
Published by  :
Siddhi Naringrekar

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार्‍या टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्यापूर्वीच मुंबई पोलिसांना धमकी देण्यात आल्याची माहिती मिळत आहे. एका अज्ञात व्यक्तीनं ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांना धमकी दिली आहे.

सामन्यादरम्यान आम्ही आग लावू. असे म्हणत धमकी देण्यात आली आहे. या सामन्यासाठी . मुंबई पोलीस सज्ज झाले असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आलेला आहे. आज भारताचा मुकाबला न्यूझीलंडशी होणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुंबई पोलिसांच्या ट्विटरला टॅग करत, एका फोटोत गन, हॅड ग्रेनेड आणि काडतुस असलेले चित्र पोस्ट केले. त्याचबरोबर भारत न्यूझीलंड सामन्या दरम्यान आग लगा देंगे अशा आशयाचे चित्र पोस्ट केले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com