Hardik Pandya
Hardik Pandya

"कुणीतरी रस्त्यावर येणार..."; हार्दिक पंड्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांनंतर नताशा स्टॅनकोविकची पोस्ट व्हायरल

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून ट्रोल झालेला पंड्या आता वैयक्तित जीवनातही प्रकाशझोतात आला आहे.
Published by :

Natasha Stankovic Instagram Post Viral : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून ट्रोल झालेला पंड्या आता वैयक्तित जीवनातही प्रकाशझोतात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पंड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्यात घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. अशातच नताश स्टॅनकोविकने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. कुणीतरी रस्त्यावर येणार...असं कॅप्शन या स्टोरीला देण्यात आलं आहे. त्यामुळे सोशल मीडियावर नताशाची पोस्ट तुफान व्हायरल झाली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविकचा घटस्फोट झाल्यास, हार्दिक पंड्याची ७० टक्के प्रॉपर्टी नताशाच्या नावावर होईल. संपत्तीबाबत सुरु असलेल्या चर्चांनंतर नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली. या स्टोरीत एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत रस्त्यावर असणाऱ्या सर्व नियमांचे चिन्ह दाखवण्यात आले आहेत. कुणीतरी रस्त्यावर येणार...असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हार्दिक पंड्या आणि नताशा स्टॅनकोविकने २०२० मध्ये लग्नबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला होता.

Natasha Stankovic Instagram Post
Natasha Stankovic Instagram Post

त्यांना अगस्त्य नावाचा एक मुलगा आहे. पण आता लग्नाच्या चार वर्षानंतर या कपलच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर एका यूजरने म्हटलं होतं की, इन्स्टाग्रामवर नताशाने तिच्या प्रोफाईलवरून पंड्या सरनेम काढलं. याशिवाय तिने हार्दिकसोबत शेअर केलेले फोटोही काढून टाकले आहेत. ज्या फोटोंमध्ये अगस्त्य आहे, असेच फोटो तिने इन्स्टाग्रामवर कायम ठेवले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com