मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर; नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांना खेलरत्न

मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर; नीरज चोप्रा, मिताली राजसह 12 जणांना खेलरत्न

Published by :
Published on

2020च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचणारा गोल्डन बॉय नीरज चोप्रा याच्यासह एकूण 12 जणांना मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्य पदक जिंकून देणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह याचाही खेलरत्न पुरस्कारात समावेश करण्यात आला आहे. खेलरत्न पुरस्कारासाठी 11 जणांची नामंकने होती. मनप्रीत सिंह याचं नाव समाविष्ट करण्यात आल्यामुळे एकूण 12 जणांना खेलरत्न पुरस्कार मिळणार आहे.

शिखर धवन, संदीप नरवाल आणि भवानीदेवी यांच्यासह 35 जणांना अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. तर 10 जणांना द्रोणाचार्य पुरस्कार देण्यात येणार आहे. 13 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती भवनमध्ये सर्वांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेमुळे यंदा या पुरस्कारांची उशीरा घोषणा झाली आहे. यंदाच्या क्रीडा पुरस्कारांमध्ये ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं नाव उंचावणाऱ्या खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com