Neeraj Chopra : अभिमानास्पद ! नीरज चोप्राचा नवा विक्रम; भालाफेकीत गाठलं 90 मीटरचे अंतर
(Neeraj Chopra) कतारची राजधानी दोहा येथे शुक्रवारी रात्री 16 मे रोजी डायमंड लीग स्पर्धा झाली या स्पर्धेत नीरजने जबरदस्त कामगिरी केली आहे. या स्पर्धेत नीरजने तिसऱ्या थ्रोमध्ये पहिल्यांदाच 90 मीटरचा अडथळा पार केला. गेल्या वर्षी डायमंड लीगच्या अंतिम फेरीत त्याचे जेतेपद हुकलं होतं.
पहिल्यावेळी नीरजने 88.44 मीटर भाला फेकला त्यानंतर दुसऱ्या प्रयत्न अपयशी ठरला, त्यानंतर नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात मात्र 90.23 मीटर भाला फेकला. 90.23 मीटरचा शानदार थ्रो करून नीरजने ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
अधिक लांब भाला फेकणाऱ्या खेळाडूंच्या मानाच्या यादीत नीरजने स्थान मिळवलं आहे. नीरज चोप्रा 90.23 मीटरच्या भालाफेकनंतर डायमंड लीग स्पर्धेत जिंकणाऱ्या यादीत आघाडीवर होता. मात्र चॅम्पियन खेळाडू ज्युलियन वेबरने 91 मीटर दूर भालाफेक करत पहिलं स्थान पटकावलं. 90 मीटरपेक्षा अधिक दूर भाला फेकत वर्ल्ड रेकॉर्ड करणाऱ्या जगातील 25 भालाफेकपटूंमध्ये नीरजच्या नावाचा समावेश झाला आहे.