भालाफेकमध्ये भारताचा डब्बल धमाका! नीरजला सुवर्ण तर जेनाला रौप्य

भालाफेकमध्ये भारताचा डब्बल धमाका! नीरजला सुवर्ण तर जेनाला रौप्य

भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्राने भालाफेकमध्ये पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. नीरजसोबतच किशोर जेना यांनीही उत्तम कामगिरी केली आहे.

नवी दिल्ली : भारताचा स्टार अ‍ॅथलीट नीरज चोप्राने भालाफेकमध्ये पुन्हा एकदा चमकदार कामगिरी केली आहे. नीरजने टीम इंडियाला सुवर्णपदक मिळवून दिले. नीरजसोबतच किशोर जेना यांनीही उत्तम कामगिरी केली आहे. किशोर जेनाला रौप्य पदक मिळाले आहे.

नीरजने पहिल्याच प्रयत्नात 82.38 मीटर फेक केली. दुसऱ्या थ्रोमध्ये त्याने 84.49 मीटर अंतर फेकले. त्याने चौथ्या प्रयत्नात 88.88 मीटर अंतरापर्यंत फेकले. पाचवीत 80.80 मीटर अंतर फेकले.

तर, नीरज चोप्राने सुवर्णपदक मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. तर, किशोर जेना दुसऱ्या क्रमांकावर आहे. किशोरने 87.54 मीटरचे अंतर कापले आहे. भालाफेकच्या सध्याच्या क्रमवारीत किशोर अव्वल स्थानी आला आहे. किशोरची ही आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. यासोबतच किशोर पॅरिस ऑलिम्पिकसाठीही पात्र ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com