IND vs SA 2nd ODI :  ऋतुराज-विराटची दमदार शतके, भारताचे रायपुरमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य!

IND vs SA 2nd ODI : ऋतुराज-विराटची दमदार शतके, भारताचे रायपुरमध्ये दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचे लक्ष्य!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज ३ नोव्हेंबर २०२५ रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात येत आहे. टॉस गमावणाऱ्या भारतीय संघाने ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहलीच्या शतकांच्या जोरावर ३५८ धावा केल्या. आता दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी धावा कराव्या लागणार आहेत. या सामन्यात ऋतुराज गायकवाडने १०५ धावा तर विराट कोहलीने १०२ धावांची खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॅनसेनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.

दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन खालीप्रमाणे

भारतीय संघ : यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, विराट कोहली, रुतुराज गायकवाड, केएल राहुल (कर्णधार, यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, प्रदीप सिंह,

दक्षिण आफ्रिका संघ : एडन मार्कराम, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), टेम्बा बावुमा (कर्णधार), मॅथ्यू ब्रेट्झके, डेवाल्ड ब्रेविस, टोनी डी जिओर्गी, मार्को जॅनसेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, नांद्रे बर्गर, एनगिडी .

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com