PV Sindhu Marriage: पी.व्ही. सिंधू लवकरच अडकणार लग्नबंधनात! कोण आहे तिचा जोडीदार?
पी.व्ही. सिंधू भारतातील दिग्गज बॅडमिंटनपटूंपैकी एक आहे. चॅम्पियन बॅडमिंटनपटूने रिओ 2016 आणि टोकियो 2020 मध्ये एकामागो माग एक ऑलिम्पिक पदके जिंकली होती. तिने 2017 मध्ये जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च स्थान मिळवले आहे. यानंतर तिने 2019 मध्ये सुवर्ण पदकांसह जागतिक स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत, तर त्याचसोबत तिने ऑलिम्पिक स्पर्धेत देखील रौप्य आणि कांस्यपदकं पटकावली आहेत.
पी.व्ही. सिंधूने नुकतीच एक आनंदाची बातमी दिली आहे पी.व्ही. सिंधूची लग्नघटिका समीप आल्याची बातमी समोर आली आहे. एक महिन्यापूर्वीच सिंधूचा विवाह ठरला आहे असं तिच्या वडिलांनी सांगितले. त्याचसोबत तिचे वडिल म्हणाले जानेवारीपासून तिचे बॅडमिंटनचे वेळापत्रक व्यस्त असल्यामुळे सिंधूचा विवाह डिसेंबरमध्ये ठरवण्यात आला आहे. राजस्थानमधील उदयपूर येथे 22 डिसेंबरला होणार आहे तसेत हैदराबादमध्ये 24 डिसेंबरला तिच रिसेप्शन होणार आहे. तिच्या जोडीदाराचे नाव व्यंकट दत्ता साई असे आहे.
व्यंकट दत्ता साई यांच्याबद्दल जाणून घ्या
पी.व्ही. सिंधूचा जोडीदार व्यंकट दत्ता साई यांनी जेएसडब्ल्यू आणि सोलर अॅपल ॲसेट मॅनेजमेंटमध्ये काम केले असून ते पोसाइडेक्स टेक्नॉलॉजीजचे कार्यकारी संचालक आहे तर त्यांच्या या कंपनीचा नवीन लोगो पी. व्ही. सिंधूने गेल्या महिन्यात लॉन्च केला होता. एचडीएफसी आणि आयसीआयसीआय यांसारख्या मोठ्या बँकांसाठी जलद कर्ज प्रक्रिया आणि क्रेडिट स्कोअर जुळण्यासारख्या सुविधा प्रदानचे काम व्यंकट दत्ता साई करतात. त्याचसोबत टी20 लीग, आयपीएल या स्पर्धांसोबत पण त्यांचे नाव जोडलेले आहे.