क्रीडा
SRH vs KKR Live | राजस्थान रॉयल्सचा गोलंदाजीचा निर्णय
आयपीएलच्या 14 व्या पर्वातील चौथा सामना आज राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यात रंगणार आहे. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॅास जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. तर पंजाबला प्रथम फलंदाजीला उतरावे लागणार आहे. लवकरच या सामन्याला सुरुवात होणार आहे.
दोन्ही संघ नव्या जोमाने आजपासून आयपीएल 2021 चा श्रीगणेशा करणार आहेत. पंजाबने गेल्या वर्षीच युवा खेळाडू के. एल. राहुल याच्याकडे संघाची धुरा सोपवली आहे. तर राजस्थानने यंदा युवा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनवर विश्वास दाखवत त्याला संघाचं नेतृत्व करण्याची संधी दिली आहे. त्यामुळे आज दोन युवा कर्णधरांमध्ये सामना रंगणार आहे.