RCB, IPL 2024
RCB, IPL 2024

...म्हणून RCB नं आजपर्यंत एकही आयपीएल ट्रॉफी जिंकली नाही, ३ कारणे आली समोर

आरसीबीला आजपर्यंत आयपीएलचं जेतेपद जिंकता का आलं नाही? जाणून घ्या यामागची तीन कारणे...
Published by :

Why RCB Did Not Win Single IPL Trophy : यंदाच्या आयपीएल हंगामात प्ले ऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर आरसीबीच्या जेतेपद जिंकण्याच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, राजस्थान रॉयल्स विरोधात झालेल्या एलिमिनेटर सामन्यात आरसीबीचा पराभव झाला आणि आयपीएल २०२४ मध्येही ट्रॉफी जिंकण्याचं आरसीबीच्या स्वप्न चक्काचूर झालं. आरसीबीने आतापर्यंत आयपीएल इतिहासात ३ वेळा फायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. तसच आरसीबीने अनेकदा प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. तरीही आरसीबीला आयपीएलची टॉफी जिंकण्यात यश मिळालं नाही. आरसीबीला आजपर्यंत आयपीएलचं जेतेपद जिंकता का आलं नाही? जाणून घ्या यामागची तीन कारणे...

१) मोठ्या सामन्यांचा दबाव घेत नाहीत

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाची जी परिस्थिती आहे, तशीच परिस्थिती आयपीएलमध्ये आरसीबीची आहे. ज्या प्रकारे टीम इंडिया आयसीसीच्या नॉकआऊट सामन्यांमध्ये प्रवेश करून पराभूत होते, तशाचप्रकारे आरसीबी प्ले ऑफमध्ये प्रवेश करून पराभूत होते. आरसीबीने २००९ च्या फायनल, आयपीएल २०१० सेमीफायनल, २०११ फायनल, २०१६ फायनल, २०२२ ला क्वालिफायर आणि २०२४ ला एलिमिनेटर सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे आरसीबीला मोठ्या सामन्यांचा दबावात खेळता येत नाही, त्यामुळे त्यांचा अशा सामन्यांमध्ये पराभव होतो.

२) जिंकण्याच्या मानसिकतेची कमी असणं

जर एखादा संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करून सतत पराभूत होत असेल, तर कुठेतरी त्यांच्या माईंड सेटमुळे असं होत असेल. जर तुम्ही बौद्धिक क्षमतेतून कोणत्याही गोष्टीसाठी तयार नसाल, तर ती गोष्ट पूर्ण करण्यात तुम्हाला यश येणार नाही. नॉक आऊट सामन्यांमध्ये प्रवेश केल्यानंतर आरसीबीचा माईंड सेट चुकीचा होतो. ते अनावश्यक दबावात खेळतात. कोणत्याही सामन्यात तुम्ही भीतीनं खेळाल, त्यावेळी तुम्ही उत्तम कामगिरी करु शकत नाही. आरसीबीसोबत असंच काहीसं होत आहे.

३) एकही ट्रॉफी न जिंकण्याचा दबाव

आतापर्यंत एकदाही आयपीएलची ट्रॉफी जिंकली नाही, असाही दबाव आरसीबीवर आहे. यावेळी आरसीबीचा संघ आयपीएलचं जेतेपद जिंकेल का? आयपीएल हंगाम सुरु होण्यापूर्वी अशाप्रकारच्या चर्चा सोशल मीडियावर रंगतात. सुरुवातीलाच तुमच्यावर अशाप्रकारचा टॅग लावला जातो, ज्यामुळे पुढचा प्रवास थोडा कठीण बनतो. अशा परिस्थितीत तुम्ही अतिरिक्त दबावात खेळता आणि तुम्ही नैसर्गिकपणे खेळत नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com