IPL 2025 RCB New Captain: विराट कोहलीचा पत्ता कट? रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार

IPL 2025 RCB New Captain: विराट कोहलीचा पत्ता कट? रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार

रजत पाटीदार आरसीबीचा नवा कर्णधार म्हणून नियुक्त. विराट कोहलीची कर्णधाराची जागा घेत रजत पाटीदार संघाचे नेतृत्व करणार आहे. आयपीएल २०२५ साठी आरसीबीच्या या निर्णयावर सर्वांचे लक्ष आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

क्रिकेट विश्वातून महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आयपीएलची संपूर्ण देशातील लोक आतुरतेने वाट बघतात. आयपीलचा १८ वा हंगाम लवकरच सुरु होणार आहे. मात्र तारीख अद्याप समोर आली नाही. या आयपीएलचे वेळापत्रक काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अशातच आता आरसीबीने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरसीबी ( रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) संघाने आठव्या कर्णधाराचे नाव पत्रकार परिषद घेत घोषित केले.

रजत पाटीदार हा आता आरसीबीचा कर्णधार असणार आहे. आरसीबीने आतापर्यंत विजेता संघामध्ये आपले स्थान निर्माण करु शकले नाहीत. मात्र यंदाच्या वर्षी रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली विजेत्या संघामध्ये आपले स्थान निर्माण करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

रजतची आयपीयलमधील कारकीर्द

2025 आयपीएलच्या आरसीबी संघाचे नेतृत्व रजत पाटीदार करणार आहे. ३१ वर्षीय रजतने मेगा टी-२० लीगमध्ये २७ सामने खेळाले आहेत. ज्यामध्ये त्याने २४ सामन्यांमध्ये फलंदाजी करत ३४.७४ च्या सरासरीमध्ये ७९९ धावा केल्या आहेत.

रजत आरसीबीचा आठवा कर्णधार

रजत पाटीदार हा आरसीबीचा आठवा तर चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी राहुल द्रविड, अनिल कुंबळे आणि विराट कोहली या भारतीय खेळांडूनी आरसीबीची धुरा सांभाळली आहेत. तसेच केविन पीटरसन, डॅनियल व्हीटोरी, शेन वॉटसन आणि फाफ डु प्लेसिस या विदेशी खेळाडूंनी याआधी आरसीबीचं नेतृत्व केलं आहे.

आरसीबीच्या कर्णधारांची यादी

राहुल द्रविड 2008-2008

अनिल कुंबळे 2009-2010

विराट कोहली 2011-2023

केविन पीटरसन 2009-2009

डॅनियल व्हीटोरी 2011-2012

शेन वॉटसन 2017-2017

फाफ डू प्लेसिस 2022-2024

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com