RCB Wins WPL 2024: RCB च्या महिलांनी पहिल्यांदा विजेतेपद पटकावले; दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव

RCB Wins WPL 2024: RCB च्या महिलांनी पहिल्यांदा विजेतेपद पटकावले; दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव

रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव करून विजेतेपदाचा दुष्काळ संपवला.
Published by :
Dhanshree Shintre

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने महिला प्रीमियर लीग (WPL) 2024 च्या हंगामात इतिहास रचला आहे. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा ८ गडी राखून पराभव करून विजेतेपदाचा दुष्काळ संपवला. IPL च्या 16 सीझनमध्ये विराट कोहली आणि ब्रिगेड जे करू शकले नाही ते स्मृती मंधानाच्या नेतृत्वाखालील RCB संघाच्या मुलींनी केले आहे.

WPL हा दुसरा सीझन होता, जो आरसीबीने जिंकला आहे. मुंबई इंडियन्स (MI) पहिल्या सत्रात चॅम्पियन ठरला. दोन्ही वेळा दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. मात्र RCB महिला संघाने जेतेपद पटकावल्याने आयपीएलमध्ये कोहली आणि ब्रिगेडवर दडपण वाढणार आहे.

दरम्यान, आयपीएलमध्ये आतापर्यंत 16 सीझन झाले आहेत आणि आरसीबी संघाने एकदाही विजेतेपद पटकावलेले नाही. विराट कोहलीने 2013 ते 2021 पर्यंत आरसीबीचे नेतृत्व केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com