Rohit Sharma
Rohit Sharma

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास संपल्यानंतर रोहित शर्माबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
Published by :

Rohit Sharma Latest Update : आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा प्रवास संपल्यानंतर रोहित शर्माबाबत अनेक तर्क-वितर्क लढवले जात आहेत. रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. याबाबत मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरने मोठी प्रतिक्रिया दिली आहे. रोहित शर्माच्या भविष्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. या हंगामाविषयी रिव्हूय करण्यासाठी मी रोहितशी चर्चा केली होती. आता पुढे काय? असा प्रश्न मी रोहितला विचारला होता. त्यानंतर रोहितने एव्हढच म्हटलं, वर्ल्डकप...हे योग्य उत्तर होतं. पुढच्या वर्षी मोठा लिलाव आहे. काय होणार आहे, याबाबत कुणालाही माहित नाही, असं बाऊचर म्हणाला आहे.

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सची कमान सांभाळली होती. त्यानंतर मुंबईला आयपीएलमध्ये पाचवेळा जेतेपद जिंकवून दिलं. आयपीएल २०२४ मध्ये रोहितला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं. त्याच्या जागेवर हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे आयपीएलच्या पुढील हंगामात रोहित शर्मा मुंबई इंडियन्ससाठी मैदानात उतरणार नाही, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.

रोहित मुंबई इंडियन्समधून बाहेर पडून दुसऱ्या संघासाठी खेळेल, असाही सूर सोशल मीडियावर उमटू लागला आहे. रोहित काही दिवसांपूर्वी कोलकाता नाईट रायडर्सच्या कॅम्पमध्ये असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर नेटकऱ्यांनी म्हटलं होतं की, रोहित शर्मा केकेआरच्या संघासाठी खेळणार आहे. मुंबई इंडियन्सला शेवटच्या लीग सामन्यातही पराभवाचा सामना करावा लागला. लखनऊ सुपर जायंट्सने मुंबईचा १८ धावांनी पराभव केला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com