Rohit Sharma On Naushad Khan
Rohit Sharma On Naushad Khan

"सर्फराजच्या वडिलांसोबत कांगा लीग खेळलोय...", रोहित शर्मानं दिला मैदानातील आठवणींना उजाळा

युवा खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळं भारताने इंग्लडविरोधात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत ४-१ ने आघाडी घेत विजयाचा झेंडा फडकवला होता.
Published by :

टीम इंडियाने इंग्लंडविरोधात नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत विजयाचा झेंडा फडकवला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियात पदार्पण करणाऱ्या खेळाडूंवर स्तुतीसुमने उधळली. यूवा खेळाडूंसोबत खेळताना मलाही खूप आनंद झाला, असं रोहितनं म्हटलं होतं. विराट कोहलीसह काही अनुभवी खेळाडू संघात नसतानाही रजत पाटीदार, ध्रुव जुरेल, सर्फराज खान, आकाश दीप आणि देवदत्त पड्डीकलने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या युवा खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळं भारताने इंग्लडविरोधात ४-१ ने आघाडी घेत कसोटी मालिका खिशात घातली. त्यानंतर रोहित शर्माने इन्स्टाग्रामवर एका पोस्टच्या माध्यमातून मोठी प्रतिक्रिया दिली.

रोहितने इन्स्टाग्रामवर म्हटलं, मला या खेलाडूंसोबत खेळताना व्यक्तिगतरित्या खूप आनंद झाला. यामध्ये काही खेळाडूंच्या कार्यक्षमतेबाबत मला चांगल्या प्रकारे माहिती होतं. त्यांना मैदानाच खेळायचं आहे, हेही मला महिती होतं. क्रिकेटमध्ये त्यांना परिपक्व करणं, हेच माझं काम आहे. ज्या प्रकारे हे खेळाडू मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि माझ्या अपेक्षांवर खरे उतरले, ते पाहून आनंद झाला. रोहितने या खेळाडूंच्या पदार्पणावर बोलताना म्हटलं, मी या सर्व खेळाडूंच्या पदार्पणात रमलो होतो. त्यांचे आई-वडीलही तिथे होते. मला त्याचं पदार्पण पाहून आनंद झाला.

रोहितने सर्फराजचं उदाहरण देत म्हटलं, मी युवा खेळाडू असताना सर्फराजच्या वडिलांसोबत (नौशाद खान) खेळलो होतो. मी त्यांचा प्रवास पाहिला आहे. मी लहान असताना सर्फराजच्या वडीलांसोबत कांगा लीगमध्ये खेळलो आहे. सर्फराजचे वडील आक्रमक फलंदाज होते आणि मुंबई क्रिकेट सर्कलमध्ये खूप लोकप्रिय होते. त्यांनी घेतलेले अपार कष्ट आणि मेहनत पाहता त्यांचा मुलगा सर्फराजला याचा खूप फायदा झाला. सर्फराजला मिळालेली टेस्ट कॅपचं संपूर्ण श्रेय त्याच्या वडीलांना जातं, इतकच मला म्हणायचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com