Virat Kohli
Virat Kohli

टीम इंडियाच्या 'विराट' जागेवर कोणत्या खेळाडूला मिळणार संधी? 'हे' तीन खेळाडू ठरू शकतात उत्तराधिकारी

टी-२० वर्ल्डकप २०२४ चा किताब जिंकल्यानंतर टीम इंडियाचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीनं टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Published by :

Three Players Who Can Replace Virat Kohli In T20 : टीम इंडियात विराट कोहलीची कमी भरणं अशक्यच आहे. परंतु, टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर भारताला 'कोहली युग'च्या पुढं जावं लागणार आहे. टीम इंडियाच्या स्क्वॉडमध्ये एकापेक्षा एक जबरदस्त खेळाडूंची मांदीयाळी आहे. देशात असे युवा खेळाडू आहेत, जे टीम इंडियातील विराट कोहलीची पोकळी भरून काढू शकतात. अशातच तीन खेळाडूंच्या नावाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हे खेळाडू विराटच्या जागेवर टीम इंडियासाठी टी-२० क्रिकेटमध्ये खेळू शकतात.

संजू सॅमसन

संजू सॅमसनचं नाव खास लिस्टमध्ये अव्वल स्थानावर आहे. सॅमसन टीम इंडियाचा नियमीत सदस्य नाही. पण भारतीय संघासाठी संजू दिर्घकाळासाठी क्रिकेट खेळू शकतो. कोहलीला टी-२० फॉर्मेटमध्ये नंबर ३ वर फलंदाजी करताना पाहिलं आहे. तसच सॅमसनही आयपीएलमध्ये राजस्थानसाठी नंबर तीनवर फलंदाजीला उतरतो. सॅमसनने राजस्थान रॉयल्ससाठी ३ नंबरवर फलंदाजी करून चमकदार कामगिरी केली आहे. अशातच कोहलीच्या जागेवर संजू सॅमसनला संधी दिली जाऊ शकते. संजू सॅमसनला भारतीय संघात सामील केल्यास अनेक फायदे होऊ शकतात. तो संघाचं नेतृत्व करण्यासह विकेटकीपींगही करू शकतो.

शुबमन गिल

टी-२० वर्ल्डकप २०२४ साठी शुबमन गिलला टीम इंडियाच्या मुख्य स्क्वॉडमध्ये जागा मिळाली नाही. परंतु, शुबमन गिलकडे विराट कोहलीसारखा क्लास आहे, यात काही शंका नाही. देशातील अनेक दिग्गज खेळाडूंना वाटतं की, शुबमनकडे कोहलीसारखेच कौशल्य आहेत. त्यामुळे शुबमनला कोहलीच्या ३ नंबरच्या जागेवर कायमस्वरुपी संधी मिळू शकते.

ऋतुराज गायकवाड

सीएसकेचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाडच्या नावाचाही या लिस्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. ऋतुराजने आयपीएलमध्ये अप्रतिम फलंदाजी करून क्रिकेटविश्वात छाप टाकली आहे. त्यामुळे टीम इंडियात कोहलीच्या जागेवर ऋतुराज गायकवाडलाही संधी मिळू शकते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com