Saurav Ghosal | Commonwealth Game
Saurav Ghosal | Commonwealth Gameteam lokshahi

Saurav Ghosal Commonwealth Games 2022 : सौरव घोषालने रचला इतिहास, पटकावलं कांस्यपदक

जाणून घ्या कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये भारताने किती पदक जिंकली
Published by :
Team Lokshahi

Commonwealth Games 2022 : 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक पदक मिळाले आहे. भारताच्या सौरव घोषालने स्क्वॉशमध्ये कांस्यपदक जिंकले आहे. स्क्वॉशच्या एकेरीत भारताने पदक जिंकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या पदकासह भारताच्या एकूण पदकांची संख्या 15 झाली आहे. (saurav ghosal bronze medal squash commonwealth games 2022)

कांस्यपदकाच्या या लढतीत सौरव घोषालचा सामना इंग्लंडच्या जेम्स विल्स्ट्रॉपशी होणार होता. सुरुवातीपासून सौरवची येथे मजबूत पकड होती आणि त्याने तीन सेटमध्ये विजय मिळवला.

Saurav Ghosal | Commonwealth Game
5 ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार, भाजपच्या 7 तर शिंदे गटातील 5 नावांचा समावेश

सेट-दर-सेट स्कोअरबद्दल बोलायचे तर सौरवने प्रतिस्पर्ध्याचा 11-6, 11-1 आणि 11-4 असा पराभव केला आणि इंग्लंडच्या खेळाडूचा 3-0 असा पराभव केला. सौरवच्या नावाने इतिहास रचला, कारण याआधी राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला स्क्वॅशच्या एकाही स्पर्धेत पदक मिळाले नव्हते.

35 वर्षीय सौरव घोषाल हा कोलकाता, पश्चिम बंगाल येथून आला आहे. भारताचा सुपरस्टार सौरव याला स्क्वॅशमध्ये अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, त्याने राष्ट्रकुल क्रीडा 2018 मध्ये रौप्य पदकही जिंकले आहे. तर आशियाई क्रीडा स्पर्धेत त्याने 5 कांस्य, एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकले आहे.

Saurav Ghosal | Commonwealth Game
OnePlus 10T 5G लाँच, 19 मिनिटांत होईल चार्ज, सेलमध्ये ऑफर

कॉमनवेल्थ गेम्स 2022 मधील भारताचे पदक विजेते (3 ऑगस्ट 2022 पर्यंत)

1. संकेत महादेव- रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)

2. गुरुराजा- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 61 किलो)

3. मीराबाई चानू- सुवर्णपदक (वेटलिफ्टिंग ४९ किलो)

4. बिंदियारानी देवी - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 55 किलो)

5. जेरेमी लालरिनुंगा - सुवर्ण पदक (67 किलो वजन उचलणे)

6. अचिंता शेउली - सुवर्णपदक (73 KG वेटलिफ्टिंग)

7. सुशीला देवी - रौप्य पदक (जुडो 48 किलो)

8. विजय कुमार यादव – कांस्य पदक (जुडो 60 किलो)

9. हरजिंदर कौर- कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 71 किलो)

10. महिला संघ- सुवर्णपदक (लॉन बॉल)

11. पुरुष संघ- सुवर्णपदक (टेबल टेनिस)

12. विकास ठाकूर - रौप्य पदक (वेटलिफ्टिंग 96 किलो)

13. मिश्र बॅडमिंटन संघ - रौप्य पदक

14. लवप्रीत सिंग – कांस्य पदक (वेटलिफ्टिंग 109 किलो)

15. सौरव घोषाल – कांस्य पदक (स्क्वॉश एकेरी स्पर्धा)

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com