रोहित शर्माबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानावर शमा मोहम्मद यांचे वक्तव्य, म्हणाल्या, "एका खेळाडूने..."
टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर आता टीम इंडियाचं लक्ष्य चॅम्पियन्स ट्रॉफीवर आहे. रोहित शर्मा आणि टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी रोहितच्या वाढलेल्या वजनावर टिप्पणी करत त्याला लठ्ठ म्हटलं आहे. तसेच त्याला भारतीय इतिहासातील सर्वात 'अप्रभावशाली' कर्णधार म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर अनेकांनी त्याच्यावर निशाणा साधत टीका केली आहे.
शमा यांच्यावर होत असलेल्या टिकेनंतर आता स्वतः शमा यांनी त्यांची बाजू मांडली आहे. त्या म्हणाल्या की, "मी रोहित शर्माच्या फिटनेसवर भाष्य केले आहे. तो एक खेळाडू म्हणून ओव्हरवेट आहे असे मला वाटते. रोहित भारतीय संघाचा कर्णधार आहे. त्याने फिट असलं पाहिजे. मी त्याची तुलना राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर , विराट कोहली आणि सौरव गांगुली यांच्याशी केली. त्याने फिट असावं असं मला वाटतं".