शार्दुल ठाकुरची विकेट, साखरपूडा पडला पार

शार्दुल ठाकुरची विकेट, साखरपूडा पडला पार

Published by :

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकर यांचा साखरपूडा मुंबईत वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पार पडला. या साखरपूड्यात फक्त जवळचे नातेवाईक उपस्थित होते. मिळालेल्या माहितीनूसार पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर हे दोघे लग्न करणार आहे.

शार्दुल ठाकुरच्या साखपूड्यानंतर अनेकांनी सोशल मिडीयाद्वारे त्यांना शुभेच्छा दिल्याच पाहायला मिळाल. शार्दुलची होणारी बायको ही ठाण्यातील "ऑल द बेक्सठ" नावाची स्टार्ट-अप कंपनी चालवते. तर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत अर्धशतके झळकावून शार्दुलने फलंदाज म्हणूनही आपली ओळख मजबूत केली आहे.

चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल २०२१चा चॅम्पियन बनवण्यात शार्दुलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या स्पर्धेत संघासाठी १६ सामन्यात २१ विकेट घेतल्या. शार्दुलने अलीकडच्या काळात आपल्या फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com