Maharashtra Kesari 2023; शिवराज राक्षे दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी

शिवराज राक्षे याने 65 वा महाराष्ट्र केसरी किताब जिंकला आहे. शिवराज राक्षे याने मानाची गदा पटकावली आहे. या महाराष्ट्र केसरी फायनल सामन्याचं आयोजन हे धाराशीवमधील गुरुवर्य के
Published by  :
shweta walge

शिवराज राक्षे हा पुन्हा एकदा महाराष्ट्र केसरी ठरलाय. धाराशिव येथे ६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न झाली असून यात शिवराज राक्षे याने ६-० ने हर्षवर्धन सदगिरचा पराभव केला आहे. याबद्दल शिवराज याला आयोजक सुधिर पाटील यांच्या हस्ते मानाचीp चांदीची गदा अन् scoripio गाडी देण्यात आलीय. तर उप महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगिर याला ट्रॅक्टर आणि चांदीची गदा देण्यात आलीय. सुरुवातीपासूनच ह्या कुस्तीत मोठी चुरस पाहायला मिळाली.धाराशिव येथे आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ , जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com