'6,6,6,6,6,6...' क्रिकेटच्या 'सिकंदर'ची बॅट तळपली; गोलंदाजांची उडाली दाणादाण

'6,6,6,6,6,6...' क्रिकेटच्या 'सिकंदर'ची बॅट तळपली; गोलंदाजांची उडाली दाणादाण

झिम्बाब्वे संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याची बॅट सध्या मैदानात तळपते आहे.

नवी दिल्ली : झिम्बाब्वे संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू सिकंदर रझा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याची बॅट सध्या मैदानात तळपते आहे. नुकत्याच झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रता फेरीत सिंकदरने रझाने 'झिम आफ्रो टी-१० २०२३' मध्ये आपला फॉर्म कायम ठेवला. या लीगच्या 12व्या सामन्यात त्याने 21 चेंडूत 70 धावांची स्फोटक खेळी खेळली आणि आपल्या संघाला 7 विकेटने विजय मिळवून दिला.

हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे येथे 24 जुलै रोजी झालेल्या 12 व्या सामन्यात हरारे हरिकेन्स संघाविरुद्धच्या सामन्यात सिकंदरने धडाकेबाज फलंदाजी करत केवळ 15 चेंडूत अर्धशतक झळकावले. या सामन्यात सिकंदरने केवळ 21 चेंडूत 70 धावा केल्या. सिकंदरने या 70 धावांच्या खेळीत 6 षटकार आणि 5 चौकार लगावले. रझाने आपल्या डावातील 56 धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. रझाने 15 चेंडूत केलेले 50 धावा हे या स्पर्धेतील सर्वात जलद अर्धशतक आहे. 70 धावांची खेळी करुन रझा पॅव्हेलियनमध्ये परतला.

हरारे हरिकेन्स संघाने प्रथम फलंदाजी करत 10 षटकात 4 गडी गमावून 134 धावा केल्या. यामध्ये कर्णधार रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 32 धावा केल्या. याशिवाय लुईसने 19 चेंडूंत 2 चौकार आणि 6 षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या. त्याचवेळी बुलावायो ब्रेव्ह्स संघाने लक्ष्याचा पाठलाग करताना सिकंदरने हरारे हरिकेन्सविरुध्द जबरदस्त खेळी केली आणि अवघ्या 21 चेंडूत 70 धावा करत संघाला 7 विकेटने विजय मिळवून दिला. सिंकदर रझाने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही 1 बळी घेतला. या सामन्यातील चमकदार कामगिरीसाठी त्याला 'प्लेअर ऑफ द मॅच'चा किताबही देण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com