Tokyo Olympic | सिल्व्हर मेडल घेऊन मिराबाई चानू मायदेशात

Tokyo Olympic | सिल्व्हर मेडल घेऊन मिराबाई चानू मायदेशात

Published by :
Published on

टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या पदकाचे खाते उघडणारी मिराबाई चानू मायदेशात परतली आहे. मिराबाई चानूचे मायदेशी परतल्यावर दिल्ली एयरपोर्टवर जोरदार स्वागत करण्यात आले. वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकून दिले होते.

टोकियो ऑलिम्पिकच्या पहिल्या दिवशी मिराबाई चानूने भारताला पदक मिळवून दिले होते. वेटलिफ्टिंगमध्ये ४९ किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानू देशाला पहिला पदक मिळून दिले. मीराबाईने एकूण २०२ किलो वजन उचलले. या प्रकारात चीनच्या होउ झीहुईने सुवर्णपदक जिंकले. तर इंडोनेशियाच्या विंडी असाहने कास्यपदक जिंकले.

वेटलिफ्टिंगमध्ये रौप्यपदक जिंकणारी मीराबाई ही पहिली भारतीय महिला ठरली आहे. महिलांच्या वेटलिफ्टिंगची सुरवात स्नॅच राउंडपासून झाली. मीराबाईने पहिल्यांदा 81 किलो वजन उचलले. दुसऱ्या प्रयत्नात तिने 87 किलो वजन उचलले. पण तिसऱ्या प्रयत्नात ती अपयशी ठरली. तिसऱ्या वेळी तिला 89 किलो वजन उचलायचे होते, पण ती अयशस्वी ठरली. स्नॅच राउंडमध्ये मीराबाईने दुसरे स्थान पटकावले. चीनच्या वेटलिफ्टरने स्नॅचमध्ये 94 किलो वजन उचलत ऑलिम्पिकमध्ये इतिहास रचला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com