स्मृती मंधानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

स्मृती मंधानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Published by :
Published on

भारतीय महिला क्रिकेट टीमची सलामीवीर फलंदाज स्मृती मंधानाची अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली. भारतीय क्रिकेट चाहते सध्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिप फायनल मॅचमध्ये व्यस्त असले तरी भारतीय महिला क्रिकेटपटूही यावेळी चर्चेचा विषय ठरल्या.

ब्रिस्टल येथे इंग्लंडविरुद्ध खेळलेला एकमेव कसोटी सामना भारतीय महिला क्रिकेट संघास ड्रॉ करण्यात अपयशी ठरला, बहुतेक खेळाडूंची ही पहिली कसोटी होती. या सामन्यात भारतीय सलामीवीर स्मृती मंधाना तिच्या फलंदाजीशिवाय लुक्समुळे चर्चेत होती.

या कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसर्‍या डावात स्मृती मंधानाने अनुक्रमे 78 आणि 8 धावा केल्या. या सामन्यादरम्यान त्यांची अनेक छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com