IND vs SA 2nd ODI
IND vs SA 2nd ODI

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा 359 धावांचा विक्रमी पाठलाग; भारताचा 4 विकेट्सने पराभव, मालिकेत बरोबरी

IND vs SA 2nd ODI: रायपूरमधील रोमांचक सामन्यात दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचा विक्रमी पाठलाग करत भारतावर 4 विकेट्सने विजय मिळवला.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

दक्षिण आफ्रिकेने रायपूरमध्ये दुसऱ्या आणि करो या मरो अशा सामन्यात विक्रमी धावांचा पाठलाग करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेसमोर 359 धावांचं आव्हान ठेवले होते. जे दक्षिण आफ्रिकेने ६ विकेट्सच्या मोबदल्यात ४ बॉल आधी पूर्ण केले. त्यांनी ४९.२ ओव्हरमध्ये ३६२ धावा केल्या, जे परदेशात एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करण्याची पहिली वेळ मानली जाते. या विजयासोबत तीन सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने १-१ ने बरोबरी साधली. भारतीय संघाने ३५० पेक्षा अधिक धावा केल्या तरीही पराभव झाल्यामुळे ऋतुराज गायकवाड आणि विराट कोहली यांच्या शतकांची मेहनत व्यर्थ ठरली.

विजयात दक्षिण आफ्रिकेच्या ओपनर एडन मार्रक्रमने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने ११० धावांची शतकी खेळी केली, तर क्विंटन डी कॉक मात्र दुहेरी आकडा गाठू शकला नाही. कॅप्टन टेम्बा बवुमा आणि मॅथ्यू ब्रिट्झकेने अनुक्रमे ४६ आणि ६८ धावांची निर्णायक खेळी साकारली. डेवाल्ड ब्रेव्हीसने ३४ बॉलमध्ये ५ सिक्स आणि १ फोरसह जलद ५४ धावा केल्या. टॉनी डी झॉर्जी, १७ रन्सवर रिटायर्ड हर्ट झाला. अर्शदीप सिंहने मार्को यान्सेन याला २ रन्सवर बाद केले. कॉर्बिन बॉश आणि केशव महाराज यांनी अखेरच्या फेरीत महत्वाची भागीदारी करत टीमला विजय मिळवून दिला.

भारताच्या गोलंदाजांनी ३५८ धावांचा बचाव करण्यात अपयश आले. अर्शदीप सिंह आणि प्रसिध कृष्णा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या, तर हर्षित राणा आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. पण त्याचा काही फायदा झाला नाही. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग केली, पण काही इच्छा तोट्यांनी सामना सोडावा लागला. रोहित शर्मा १४ धावांवर माघारला.

IND vs SA 2nd ODI
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने पुन्हा टॉस जिंकत भारतावर दबाव वाढवला ; दुसऱ्या ODI मधून तिघांचा पत्ता कट, टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोण?

विराट कोहली आणि ऋतुराज गायकवाड यांनी तिसऱ्या विकेटसाठी 195 धावांची भागीदारी केली, ज्यात ऋतुराजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. विराटनेही सलग दुसरे शतक ठोकले, पण नंतर दोघेही बाद झाले. केएल राहुल आणि रवींद्र जडेजाने सहाव्या विकेटसाठी नाबाद ६९ धावांची भागीदारी केली. दक्षिण आफ्रिकेला यशस्वी वाटचाल करत सामना जिंकता आला.

IND vs SA 2nd ODI
Vijay Hazare Trophy: विजय हजारे ट्रॉफी सामन्यात कोहलीची एंट्री! प्रति सामना मिळणार तब्बल 'एवढे' रुपये
  • दक्षिण आफ्रिकेने 359 धावांचा ऐतिहासिक पाठलाग पूर्ण केला.

  • मार्क्रमने 110 धावांची निर्णायक शतकी खेळी साकारली.

  • कोहली आणि ऋतुराजची शतके असूनही भारताला पराभव स्वीकारावा लागला.

  • या विजयामुळे दक्षिण आफ्रिकेने मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com