Special Report Priyanka Ingle: प्रियंका इंगळेची खो-खोमध्ये झेप, कसा होता प्रवास?
महाराष्ट्रातल्या मातीतला खेळ खो-खोने यंदा जागतिक दर्जाचा मान मिळवला आहे. एरवी या खेळाकडे गांभीर्यानं न पाहणा-यांनी आता जागतिक स्पर्धांच्या निमित्तानं आपला मोर्चा या खेळाकडे वळवल्याचं चित्र आहे. तब्बल 23 देशांनी खो-खोच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभाग नोंदवला. पिंपरी-चिंचवडच्या मराठमोळ्या प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील संघान भारताला पहिल्याच जागति स्पर्धेत पहिला विजय मिळवून दिला. नेपाळचा मोठ्या फरकानं पराभव करत भारतीय खो-खो संघानं विजयश्री खेचून आणली. भारतीय महिला खो - खो संघाला पहिल्यांदाच आयोजित केलेल्या वर्ल्ड कप मध्ये विजेतेपद मिळवून देणाऱ्या कर्णधार प्रियंका इंगळे चा कसा होता खडतर प्रवास जाणून घ्या.
महाराष्ट्राच्या शाळेमध्ये तसेच गल्लीत खेळला जाणारा खो - खो खेळाचे आंतर राष्ट्रीय सामने होतील , अस कोणाच्या ध्यानी मनी ही नसेल याच खेळाने जागतिक पातळीवर आपली ओळख मिळवली ,पहिल्यांदाच आयोजित केलेल्या खो - खो वर्ल्ड कप मध्ये 23 देशांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत भारतीय महिलांच्या संघाचं नेतृत्व केलं ते पिंपरी चिंचवड च्या मराठमोळ्या प्रियंका इंगळे ने अन् तिच्याच नेतृत्वाखाली भारताच्या संघान फायनल मध्ये 78- 40 च्या फरकाने नेपाळच्या संघाचा पराभव केला अन् भारताला खो - खो मध्ये पहिला वर्ल्ड कप मिळवून दिला.

सर्वोच्च शिखर गाठण्यापर्यंतचा प्रियंकाचा प्रेरणादायी प्रवास
मूळच्या बीडमधील केज गावच्या इंगळे परिवाराने पोटाची खळगी भरण्यासाठी उद्योगनगरी पिंपरी चिंचवड शहराची वाट धरली, प्रियांकाच्या जन्मानंतर शहरात स्थायिक झालेल्या प्रियांकाच्या कुटुंबाने सुरूवातीला तिच्या खेळला विरोध दर्शविला मात्र तिला मिळते यश पाहता त्यांचा खेळा बद्दल असलेला गैरसमज दूर होत गेला अन् कालच्या निकाला नंतर तर त्यांच्या चेहऱ्यावर असलेला आनंद काय लपत नव्हता..
पिंपरी चिंचवड शहरातील वरमुखवाडी परिसरात असलेल्या श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात शिकत असताना प्रियंकाच्या जीवनाला आकार देणाऱ्या खो - खो मध्ये करिअर करण्याचा मार्ग सापडला. सुरवातीला प्रियांकाला रानिंगमध्ये आवड होती , त्यात टी निपुण ही होती परंतु तिझे शाळेतील क्रीडा प्रशिक्षक अविनाश करवंदे यांनी तिची खेळातील चपळता ओळखून तिला खो - खो खेण्यासाठी प्रोत्साहन दिले.त्यासाठी त्यांनी तिच्या कुटुंबीयांना ही राजी केलं. अन् आज तिच्या प्रशिक्षकांनी पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे. शाळेतल्या लाल मातीत सुरू झालेल्या प्रियंकाचा प्रवास आज आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊन पोचलाय, पहिल्याच विश्वचषक स्पर्धेत विजेते पदांना ते सर्वोच्च शिखर गाठण्यापर्यंतचा प्रियंकाचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे.