IPL 2024 Final Match
IPL 2024 Final Match

IPL 2024 Final: कोलकाता आणि हैदराबादच्या अंतिम सामन्यात पाऊस घालणार खोडा? जाणून घ्या हवामानाची अपडेट

यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक सामन्यांमध्ये पावसाने खोडा घातला. २६ मे ला होणाऱ्या आयपीएलच्या फायनल सामन्यात हवामानाची स्थिती काय असणार? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
Published by :

IPL 2024 Final Match Whether Update : आयपीएल २०२४ चा फायनलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात रंगणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण दुसरीकडे चाहत्यांना पावसाची चिंताही सतावत आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात अनेक सामन्यांमध्ये पावसाने खोडा घातला. २६ मे ला होणाऱ्या आयपीएलच्या फायनल सामन्यात हवामानाची स्थिती काय असणार? याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट अशी आहे की, पावसामुळे सामन्यावर कोणताही परिणाम होणार नाही. वेदर डॉट कॉमने दिलेल्या रिपोर्टनुसार, सामन्याच्या दिवशी आकाशात ढगाळ वातावरण असू शकतं. परंतु, ते ढग पावसाच्या पाण्याचे नसणार आहेत. याचदरम्यान खूप उष्णता पडू शकते. सामन्याच्या दिवशी पाऊस पडण्याची फक्त ३ टक्के शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे सामन्यात कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही, असा अंदाज बांधला जात आहे.

आयपीएल फायनलसाठी राखीव दिवस

या सामन्यात पाऊस पडला, तरी चाहत्यांना चिंता करण्याची आवश्यकता नाही. आयपीएल फायनल सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. जर २६ मे ला पावसाचा जोर कायम राहिला आणि सामना रद्द झाला, तर तो सामना पुढच्या दिवशी म्हणजेच २७ मे ला खेळवला जाईल. दुसऱ्या दिवशीही पाऊस पडला, तर २ तासांची अतिरिक्त वेळ दिली जाईल. या अतिरिक्त वेळेतलीह जर सामना पूर्ण झाला नाही, तर अशा परिस्थितीत पंच ५-५ षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न करतील.

सामना जर ५ षटकांचाही झाला नाही, तर सुपर ओव्हरचा निर्णय घोषित केला जाईल. पण पाऊस सतत सुरु राहिल्यास सुपर ओव्हरही झाल्या नाही, तर सामना रद्द केला जाईल. अशा स्थितीत जो संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असेल, त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. पावसामुळे फायनलचा सामना रद्द झाला आणि राखीव दिवसातही खेळ झाला नाही, तर केकेआरला आयपीएलचा २०२४ विजयी संघ म्हणून घोषित केलं जाईल.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com