सर्वाधिक गोल्समध्ये सुनील छेत्रीने मेस्सीलाही टाकलं मागे

सर्वाधिक गोल्समध्ये सुनील छेत्रीने मेस्सीलाही टाकलं मागे

Published by :

भारतीय फुटबॉलर सुनील छेत्रीने जगातील अव्वल क्रमाकांचा फुटबॉलर लिओनल मेस्सीला मागे टाकले आहे. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात त्याने लगावेलेल्या दोन गोलमुळे तो मेस्सीच्या पुढे गेला आहे. छेत्रीच्या गोल्सची संख्या 74 झाली असून मेस्सीच्या नावावर सध्या 72 गोल्स आहेत.

फिफा विश्वचषकाच्या क्वॉलीफायर सामन्यात बांग्लादेशला 2-0 ने नमवताना छेत्रीने केलेले दोन गोल महत्त्वाचे ठरले. त्याने बांग्लादेशविरोधात 79 आणि 92 व्या मिनिटाला गोल करत सामना जिंकवून दिला. फीफा विश्वचषक 2022 च्या क्वॉलीफायर्समध्ये पहिला विजय मिळवला आहे.

पहिला भारतीय खेळाडू ठरला…

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने सोमवारी झालेल्या बांग्लादेश विरोधातील सामन्यात दोन गोल लगावले. या दोन गोल्समुळे आंतरराष्ट्रीय सामन्यांत केलेल्या छेत्रीच्या गोल्सची संख्या 74 झाली. ज्यामुळे छेत्री मेस्सीला मागे टाकत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. मेस्सीच्या नावावर सध्या 72 गोल्स असून पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो 103 गोल्ससह प्रथमस्थानी आहे. या रेकॉर्डसोबतच छेत्रीने आणखी एक विशेष विक्रम आपल्या नावे केला आहे. तो पहिला भारतीय खेळाडू बनला आहे ज्याने तिन्ही दशकात देशासाठी गोल लगावले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com