BCCI T20 World Cup 2023
BCCI T20 World Cup 2023Team Lokshahi

टी-वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ जाहीर, बघा असा असेल संघ

भारताचा वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे.
Published by :
Sagar Pradhan

बीसीसीआयने आज दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी 20 वर्ल्डकपसाठी भारतीय संघाची घोषणा केली.आगामी आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी आणि दक्षिण आफ्रिकेतील तिरंगी मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीायने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने मुख्य 15 आणि राखीव 3 अशा एकूण 18 सदस्यीय संघ जाहीर केला आहे. भारतीय संघ जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ट्राय सिरीज आणि टी 20 वर्ल्डकप खेळण्यासाठी रवाना होणार आहे.

भारताचा वर्ल्ड कप मोहिमेतील पहिला सामना हा कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. हा सामना 12 फेब्रुवारीला पार पडणार आहे. तसेच अंतिम सामन्याचं आयोजन हे 26 फेब्रुवारीला करण्यात आलं आहे. अंतिम सामन्यासाठी राखीव दिवसही ठेवण्यात आलाय. कोणत्याही कारणामुळे 26 तारखेला सामना पार पडला नाही, तर तो सामना 27 फेब्रुवारीला म्हणजेच राखीव दिवशी खेळवण्यात येईल.

महिला टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ:

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, यस्तिका भाटीया (विकेटकीपर), रिचा घोष (विकेटकीपर), जेमिमा रॉड्रिग्स, हर्लिन देओल, दीप्ती शर्मा, देविका वैद्य, राधा यादव, रेणूका ठाकूर, अंजली सर्वनी, पूजा वस्त्रकार (फिटनेस टेस्ट आवश्यक), राजेश्वरी गायेकवाड आणि शिखा पांडे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com