cricketer deepak hooda
cricketer deepak hooda Team Lokshahi

वाइड न दिल्याने टीम इंडियाचा स्टार फलंदाज अंपायरवर संतापला; केली शिवीगाळ

भारत आणि श्रीलंका यांच्यात सामन्यात भारताच्या दीपक हुड्डाने आश्चर्यकारक कामगिरी केली. परंतु,या सामन्यातील आणखी एक व्हिडिओ समोर आला.

नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यात मुंबईत खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताच्या दीपक हुड्डाने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. या सामन्यात टीम इंडियाने 2 धावांनी विजय मिळवला. दीपक हुड्डाने दबावाखाली 41 धावांची खेळी केली आणि टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेले. या सामन्यातील आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये दीपक हुड्डा अंपायरला शिवीगाळ करताना दिसत आहे.

या व्हिडीओत वाइड बॉलचा निर्णय घेतल्याने दीपक हुड्डा अंपायरवर चांगलाच संतापलेला पाहायला मिळत आहे. टीम इंडियाच्या इनिंगचे 18 वी ओव्हर सुरू होती. दीपक हुडाने कसून राजिताचा पाचवा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला आणि तो ऑफ साइडच्या दिशेने बाहेर पडला. वाइड म्हणेल असा विचार करून त्याने चेंडू जाऊ दिला. पण, पंचांनी वाइड संकेत दिला नाही. यामुळे दीपक हुड्डा संतापला आणि पंचांना शिवीगाळ केली. पुढच्या चेंडूवर दीपक हुड्डाला सिंगल मिळाले आणि त्यानंतर तो अंपायरशी वादात पडला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून युझर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात दीपक हुड्डाने 23 चेंडूत 41 धावा केल्या. यात 1 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. दीपक हुड्डाने अक्षर पटेलसोबत अर्धशतकी भागीदारी करून टीम इंडियाला १६२ धावांपर्यंत नेले. कारण टीम इंडियाने 94 च्या स्कोअरवर अर्धा संघ गमावला होता आणि नंतर हुड्डाने पलटवार केला होता. भारताने शेवटपर्यंत जाऊन हा सामना 2 धावांनी जिंकला. श्रीलंकेचा संघ 20 षटकात 160 धावा केला होता.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com