ICC World Cup 2023 : वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द

ICC World Cup 2023 : वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द

वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

वनडे विश्वचषकाचा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. BCCI ने विश्वचषक सुरू अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते विश्वचषकाचं उद्घाटन पार पडणार होते.

उद्यापासून अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वनडे विश्वचषकाला सुरुवात होत आहे. याचा उदघाटन सोहळा आता रद्द करण्यात आला आहे. आयसीसी किंवा बीसीसीआयने देखील याबाबत अधिकृतरित्या स्पष्टीकरण दिलेलं नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com