WPL 2024: वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनला आजपासून सुरुवात; पहिला सामना 'या' संघात भिडणार!

WPL 2024: वुमन्स प्रीमियर लीगच्या दुसऱ्या सीझनला आजपासून सुरुवात; पहिला सामना 'या' संघात भिडणार!

आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या महिलांच्या प्रीमिअर लीगला आजपासून (शुक्रवार) येथे सुरुवात होत आहे.
Published by :
Dhanshree Shintre
Published on

आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर सुरु करण्यात आलेल्या महिलांच्या प्रीमिअर लीगला आजपासून (शुक्रवार) येथे सुरुवात होत आहे. सलामीची लढत गतविजेता मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. मुंबईचे नेतृत्व भारताच्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर करत असून दिल्लीचे कर्णधारपद ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग करत आहे. या सामन्याद्वरे यंदाच्या मोसमात विजयी सलामी देण्यासाठी दोन्ही संघ प्रयत्नशील राहतील.

एकूण 5 संघ एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 8 सामने खेळणार आहेत. नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियम आणि बंगळुरुतील एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये हे सर्व सामने पार पडतील. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिट्ल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, यूपी वॉरियर्सज आणि गुजरात जायंट्स हे संघ आमनेसामने असणार आहेत.

मुंबई इंडियन्स टीम (Mumbai Indians)

अमनजोत कौर, अमेलिया केर, अमनदीप कौर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेले मॅथ्यूज, हुमैरा काजी, इस्सी वोंग, जिंतिमनी कलिता, कीर्तन बालाकृष्णन, नट साइवर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, सजीवन संजना, प्रियंका बाला, यास्तिका भाटिया, फातिमा जाफर, सॅका इशाक, शबनिम इस्माइल.

दिल्ली कॅपिटल्स टीम (Delhi Capitals)

जेमिमाह रोड्रिग्स, लौरा हॅरिस, मेग लॅनिंग, शेफाली वर्मा, स्नेहा दीप्ति, एलिस कॅप्सी, एनाबेल सदरलँड, अरुंधति रेड्डी, जेस जोनासेन, अश्वनी कुमारी, अपर्णा मंडल, तानिया भाटिया, पूनम यादव, टिटास साधू.

हा सामना बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरु होईल. याआधी बीसीसीआयतर्फे संध्याकाळी साडेसहा वाजता उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स आपली परफॉर्फ करताना दिसणार आहेत. महिला प्रीमियर लीग 2024 चे सर्व सामने जिओ सिनेमा ॲपवर थेट प्रक्षेपित केले जातील. तुम्हाला येथे सर्व सामने मोफत पाहता येतील. तसेच मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील दुसऱ्या सत्रातील पहिला सामना संपूर्ण कुटुंबासह स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर थेट पाहू शकता. स्पोर्ट्स १८ नेटवर्कवर तुम्ही हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये या सामन्याचा आनंद घेऊ शकता.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com