IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार चुरशीची लढत,  कुणाचे पारडे जड?

IND vs ENG: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणार चुरशीची लढत, कुणाचे पारडे जड?

क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मधील 29 वी मॅच टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे.
Published by :
Team Lokshahi

World Cup 2023: क्रिकेट वर्ल्ड कप 2023 मधील 29 वी मॅच टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात होणार आहे. या मॅचमध्ये विजय मिळवत टीम इंडिया आपली विजयी घौडदौड कायम राखण्याचा प्रयत्न करणार आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाच्या आतापर्यंत एकूण 5 मॅचेस झाल्या आहेत आणि या सर्व मॅचेच टीम इंडियाने जिंकल्या आहेत. तर इंग्लंडच्या टीमने आतापर्यंत पाच मॅचेस खेळल्या असून त्यापैकी केवळ एका मॅचमध्ये विजय मिळवता आला आहे.

गतविजेता इंग्लंड विश्वचषकातलं आपलं आव्हान कायम राखणार की, त्यांचं आव्हान साखळीतच संपुष्टात येणार याचा फैसला उद्या होणाराय. योगायोगाची बाब म्हणजे विश्वचषकातल्या या सामन्यात गतविजेत्या इंग्लंडची गाठ रोहित शर्माच्या भारतीय संघाशी पडणार आहे. या दोन संघांमधला विरोधाभास म्हणजे विश्वचषकाच्या गुणतालिकेत भारत दुसऱ्या स्थानावर आहे, तर इंग्लंड शेवटून दुसऱ्या म्हणजे नवव्या स्थानावर आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारा सामना लखनौच्या इकाना स्टेडियममध्ये होणार आहे. भारतीय वेळेनुसार, दुपारी दोन वाजता सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी अर्धातास नाणेफेक होईल. टिव्हीवर स्टार स्पोर्ट्स चॅनलवर सामना पाहता येईल. स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स एचडी, स्टार स्पोर्ट्स हिंदी सह इतर भाषांमध्येही सामन्याचा आनंद घेता येईल.

टीम इंडिया - रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

टीम इंग्लंड - जॉनी बेयरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर, लियाम लिविंगस्टोन, मोईन अली, क्रिस वोक्स, डेविड विली, आदिल राशिद, मार्क वूड.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com